कर्जत येथे भीम महोत्सव उत्साहात

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत भीम महोत्सव समितीच्यावतीने दोन दिवसीय भीम महोत्सव साजरा करण्यात आला. पहिल्या दिवशी येथील पोलीस मैदानात प्रबोधन आणि दुसऱ्या दिवशी कर्जत शहरात मिरवणूक अशा प्रकारे भीम महोत्सव साजरा झाला.

कर्जत पोलीस मैदानात भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भीम महोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन भालेराव, सचिव कृष्णा जाधव आणि खजिनदार उदय जाधव यांच्या सह महोत्सव समितीने यावर्षी विविध कार्यक्रमांमधून भीम महोत्सव साजरा केला. दोन दिवसीय भीम महोत्सवाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, पहिल्या दिवशी प्रबोधन आणि सांगीतिक मेजवानी देण्यात आली. त्यात प्रबोधनकार वक्ते हनुमंत पवार यांनी अतिशय प्रभावीपणे प्रबोधन करीत समाजजागृतीचे काम केले. तसेच, या महोत्सवात भीमगीत सादर केली. गायक चेतन लोखंडे, प्रतीक सोळस, आकाश तांबे, आणि अंजली यांनी आपल्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विशेष उपस्थितीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री वनिता खरात यांनी महोत्सवाला हजेरी लावत उपस्थितीमध्ये जोश निर्माण केला. कर्जतमधील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली.

Exit mobile version