चितोबा मंदिराचे भूमिपूजन संपन्न

| शिहू | वार्ताहर |

कुर्डुस ग्रामपंचायत हद्दीतील नवखार एमआयडीसी नजिक असलेल्या जागृत देवस्थान चितोबा मंदिराचे भूमिपूजन माजी आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी कुर्डुस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप पाटील, रामचंद्र कर्वे, सुनील पिंगळे, कांचन केणी, प्रफुल्ल पाटील, किशोर पाटील, संजय पाटील, विश्वनाथ पिंगळे, अरविंद पाटील, संतोष पिंगळे, मिलिंद पाटील, धनाजी पिंगळे, धर्माजी ठाकूर, महेंद्र म्हात्रे, दत्ता ठाकूर, कलेंद्र पाटील, राहुल पाटील, अनिकेत म्हात्रे आदींसह ग्रामस्थ व महिला मोठया प्रमाणात उपस्थित होत्या. यावेळी बोलताना पंडित पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आजवर या विभागात मोठया प्रमाणात विकासकामे झाली असून पुढेहि होतील. शेकापक्ष हा गोर गरीब जनतेची कामं करणारा पक्ष आहे. या जागृत देवस्थानचे पवित्र काम करण्याची संधी मला आपण ग्रामस्थांनी दिलीत आणी ते काम मी लवकरात लवकर पूर्ण करीन असे आश्वासन या वेळी पंडित पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले.

Exit mobile version