| पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील कुंभारशेत ग्रामपंचायत हद्दीमधील बलाप गावाच्या नळपाणी योजनेसाठी किशोर खरिवले यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. रायगड जिल्हा परिषद जल जीवन मिशन नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून निधी मंजूर झाला आहे. सदर नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश खैरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी कुंभारशेत ग्रा. प. सरपंच सुनिल ठोंबरे, उपसरपंच किशोर खरिवले, प्रवीण खरिवले, राजेंद्र खरिवले, संदीप खरिवले,किरण भगत,संतोष खरिवले, खेरटकर, दिलीप खरिवले आदीसह बालाप गावातील तरुण, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. गावात सुमारे 30 ते 35 घरांची वस्ती असून या नळपाणी पुरवठा योजनेतून पाणी घरोघरी नळजोडणी करून देण्यात येणार आहे त्यामुळे आता गावातील महिलांच्या डोईवरचा भार लवकरच उतरणार असल्यामुळे गावातील महिलांनी यावेळी आनंद व्यक्त केला.







