रोहित पवार भुजबळांच्या रडारवर

मंत्रिमंडळात जाण्यासाठी सगळ्यांच्या स्वाक्षऱ्या; मंत्री छगन भुजबळांचा दावा
| नाशिक | प्रतिनिधी |
अजित पवार गटातला एकही माणूस असा नाही, जो ब्लॅकमेल करेल. काहीही आपलं बोलायचं, उलट रोहित पवार आणि सगळ्यांनी मंत्रीमंडळात जायचं, असा निर्णय घेत या पत्रावर सह्या केल्या असल्याचा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. विरोधी पक्षात असल्यावर हे बोलायला पाहिजे, नाहीतर विरोधी पक्षाचे आमदार म्हणून कसं सिद्ध होईल? यासाठी हा खटाटोप असल्याचे वक्तव्य देखील छगन भुजबळ यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. अजित पवार यांच्यासह इतर आमदार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर अनेक घडामोडी समोर आल्या. मात्र गेल्या काही दिवसात रोहित पवार आणि अजित गटातील नेत्यांचा संघर्ष टोकाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाचे एक आमदार आणि खासदार अजित पवार गटात जाण्याबाबत रोहित पवारांनी गंभीर आरोप केले.

काही नेत्यांचा ब्लॅकमेलिंग सुरू आहे, तू सही कर नाहीतर काम होणार नाही, असं कदाचित सांगितलं जात असा आरोप रोहित पवार यांनी केला. यावर भुजबळ यांनी रोहित पवार यांचा समाचार घेत मंत्रिमंडळात जाण्यासाठी रोहित पवार यांच्यासह सगळ्यांच्या सह्या पत्रावर करण्यात आल्या होत्या, असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला आहे.

Exit mobile version