नेरळ-कळंब रस्त्याचे भूमिपूजन

। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्ग 109 वरील नेरळ-कळंब भागातील रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि डांबरीकरण कामाचा शुभारंभ आ.महेंद्र थोरवे यांच्या हस्ते झाले. 900 मीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण आणि तीन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चार कोटींचा खर्च होणार आहे. या रस्त्यावर पॅचेसच्या स्वरूपात डांबरीकरण केले जाणार आहे. तर साई मंदिर येथून कळंबकडे 900 मीटरचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा बनणार आहे.

Exit mobile version