माणगावात स्वामी समर्थ मठाचे भूमीपूजन

। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव नगरीत जुने डीवायएसपी कार्यालयाजवळ वाकडाई नगर याठिकाणी स्वामी समर्थ मठाचे मंदिर साकारणार असून, या मंदिराच्या कामाचे भूमीपूजन रविवार, दि.24 एप्रिल रोजी सकाळी सांगली जिल्ह्यातील जत गावचे तुकारामबुवा महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसार माध्यमांजवळ तुकारामबुवा महाराज यांनी स्वामी समर्थ यांचे अध्यात्मिकतेचे विचार माणगाव नगरीत रुजून त्यांच्या मठातून चांगले आचार विचार समाजात पोहोचतील. या मंदिरासाठी अ‍ॅड. केदार जयंत गांधी यांनी त्यांच्या गांधी कुटुंबियांतर्फे चार गुंठे जागा उपलब्ध करून दिल्याने मी त्यांचे विशेष आभार मानत असल्याचे सांगितले.
या मंदिराच्या भूमीपूजन कार्यक्रमप्रसंगी अ‍ॅड. केदार गांधी व शलाका गांधी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या भूमीपूजन कार्यक्रमास माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, पाणीपुरवठा सभापती राजेश मेहता, स्वच्छता व आरोग्य सभापती अजित तार्लेकर, नगरसेवक कपिल गायकवाड, नगरसेविका ममता थोरे, माजी स्वीकृत नगरसेवक नितीन बामगुडे, माजी सरपंच नारायण शेट आदींसह माणगावकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version