• Login
Tuesday, June 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात

Antara Parange by Antara Parange
June 16, 2026
in अलिबाग, पनवेल, माणगाव, रायगड, रोहा, शैक्षणिक, श्रीवर्धन, सुधागड- पाली
0 0
0
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात
0
SHARES
2
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश वाटप

| अलिबाग | प्रतिनिधी |

उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारी (दि. 15) पुन्हा नव्याने शाळा सुरु झाल्या. सर्वच शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण, गुलाब पुष्प व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच, मुलांना मोफत पाठ्यपुस्तके, वह्या, शुज, गणवेश तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

बैलगाडी ठरली शाळा प्रवेशोत्सवाचे आकर्षण


पाली/बेणसे :
सुधागड तालुक्यातील नवघर शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात झाली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेत ‌‘शाळा प्रवेशोत्सव‌’ आणि ‌‘शाळापूर्व मेळावा‌’ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी पहिलीत दाखल होणाऱ्या चिमुरड्यांचे स्वागत करण्यासाठी अवघी नवघर शाळा सजली होती. प्रवेशोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली ती नवघर गावच्या पारंपरिक थाटात सजवलेली बैलगाडी. पहिलीच्या वर्गात नव्याने प्रवेश घेणाऱ्या मुलांना या आकर्षक बैलगाडीत बसवून, पुढे लेझीम आणि ढोल-ताशांच्या तालावर वाजत-गाजत संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सुवासिनींनी नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण केले. तसेच ‌‘पहिले पाऊल‌’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे घेऊन, त्यांना पुष्प व खाऊ देऊन शाळेत प्रेमाने प्रवेश देण्यात आला. हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी नवघर ग्रामपंचायतीचे सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व कमिटी सदस्य, माजी विद्यार्थी संघ, शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांच्या उत्कृष्ट नियोजन आणि पुढाकारामुळे नवघर शाळेच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत ‌‘दणक्यात‌’ आणि संस्मरणीय झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी शासनाच्या योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश आणि शूज यांचे वाटप करण्यात आले.
सेल्फी विथ मॉम!
शाळापूर्व मेळाव्यादरम्यान उभारण्यात आलेल्या खास सेल्फी पॉईंटवर आई आणि पाल्यांचे फोटो काढण्यात आले. आपल्या लाडक्या मुलाला पहिल्या दिवशी शाळेत सोडताना पालकांच्या, विशेषतः मातांच्या चेहऱ्यावरचा आनंद या सेल्फीच्या माध्यमातून कॅमेऱ्यात कैद झाला.

कामेरकर विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव


माणगाव :
माणगाव तालुक्यातील माणगाव शहरात बामणोली रोड परिसरात असणारे रायगड शिक्षण संस्था संचलित “भास्करदादा कामेरकर विद्यालय“ म्हणजेच पूर्वाश्रमीचे माध्यमिक विद्यालय माणगाव या शिक्षणसंस्थेने अनेक कुशल विद्यार्थी घडवण्याचं काम मागील 26वर्षांपासून अविरत सुरू ठेवले आहे. विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक वाढवून त्यांना स्पर्धापरीक्षापुरक आणि शिस्तप्रिय विद्यालय म्हणून माणगाव तालुक्यातील ‘भास्करदादा कामेरकर विद्यालय’ अशी या शिक्षणमंदिराची ओळख आहे. यावर्षी या विद्यालयात इयत्ता 5 वी प्रवेशासाठी पालक आणि विद्यार्थी यांचा ओघ लागला आहे. यावर्षी शाळेने 5 वी इतर वर्गातील नवीन विद्यार्थी प्रवेशाचा सुमारे 99% टक्के टप्पा पार केला आहे. यावर्षी शाळेत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेशोत्सव 2026 या कार्यक्रमात इयत्ता पाचवी व इतर इयत्ता च्या विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी आणि तोंड गोड करून शाळेकडून स्वागत करण्यात आले.

नव्या शैक्षणिक वर्षाचा उत्साहपूर्ण प्रारंभ


खांदा कॉलनी :
पनवेल महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सोमवारी (दि.15) नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पगुच्छ देऊन तसेच टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. लहानग्यांच्या रंगीबेरंगी पावलांच्या ठशांनी शाळेचा परिसर सजला होता. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी स्वागत रॅलीही काढण्यात आली. नव्या दप्तरांसह आणि चेहऱ्यावर आनंद घेऊन शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांमुळे परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय ठरला.

राऊत हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत


श्रीवर्धन :
श्रीवर्धन येथील रविंद्र ना. राऊत माध्यमिक शाळेत 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी इयत्ता 5 वीमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या मुला-मुलींचे शाळा समितीचे सभापती जितेंद्र सातनाक यांच्या हस्ते गुलाब पुष्प व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थ्यांना सातनाक, शाळा समितीचे सदस्य दत्तात्रय कोसबे, माजी प्रा. नंदा जोशी प्रा. संदीप भगत आदींच्या हस्ते शासनाकडून आलेली पाठ्यपुस्तके देण्यात आली. तसेच एस.एस.सी. परीक्षेत प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांचाही भेटवस्तु देऊन गौरव करण्यात आला. यावेळी केलेल्या आपल्या मनोगतात शाळेकडून विद्यार्थ्याना नेहमीच सहकार्य केले जाते. तरी आपली गुणवत्ता विद्यार्थ्यांनी नेहमी वाढतीच ठेवावी, असे आवाहन केले. यावेळी प्राचार्य संदीप भगत, संदीप गुरव व अन्य शिक्षकगण उपस्थित होते.

वाघ्रणला शाळा प्रवेशोत्सव साजरा


वाघ्रण :
राजिप शाळा वाघ्रणमध्ये 15 जून रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात नवीन विद्यार्थी व पालकांचे लेझीम वाजवीत स्वागत करण्यात आले. यावेळी मुलांना पुस्तके, वह्या, शुज आदी वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठ आयोजित करण्यात आले होते. मुख्याध्यापिका सुजाता गुंजाळ यांनी प्रास्ताविक शुभदा पाटीलसह शिक्षिकानी स्वागत केले. यानंतर शिक्षण तज्ञ कृष्णकांत पाटील, माजी विद्यार्थी, संच उपाध्यक्ष, पत्रकार दिपक यशवंत पाटील, विषय तज्ञ प्रशांत ठाकूर यांची मनोगते झाली. सरपंच राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

गोवे शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात


कोलाड :
शालेय शिक्षण विभागामार्फत प्रत्येक शैक्षणिक वर्षाची सुरुवात मा. लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षणप्रेमी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करून शाळेचा प्रवेश दिला जातो. या 2026-27 च्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवारी (दि.15) राजिप शाळा गोवे येथे शाळा प्रवेशोत्सवासाठी इयत्ता 1 ली वर्गासाठी दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिले पाऊल- शाळा पूर्वतयारी मेळावा क्र.2 चे आयोजन मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आला. सर्व प्रथम लेझिम नृत्याद्वारे, पुष्पवृष्टी करत दाखलपात्र विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यात आले. फुगे व शैक्षणिक किट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व मोफत गणवेशाचे वाटप शाळा व्यवस्थापण समिती सदस्य व उपस्थित पालकवर्गाच्या हस्ते करण्यात आले. यानंतर वृक्ष लागवडीचे महत्व ओळखून अंगणवाडी सेविका सुरेखा जाधव यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सर्व दाखल पात्र विद्यार्थ्यांचे फोटो काढून इयत्ता 1 लीच्या सर्व विद्यार्थ्याच्या पावलांचे ठसे घेण्यात आले. कागदावर आपल्या पायाचे ठसे पाहून मुले आनंदीत झाली व मध्यंतरीच्या काळात भोजनात मिष्ठान्न म्हणून जिलेबी देण्यात आली.

शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा


खांब :
रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या विविध शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन महेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या श्री. रा.ग. पोटफोडे (मास्तर) विद्यालय खांब, श्रमिक विद्यालय चिल्हे व न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी-राजखलाटी या तिन्ही शाळेत साजरा करण्यात आलेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश थिटे, सचिव धोंडू कचरे, संचालक रामचंद्र चितळकर, राम मरवडे, धनाजी लोखंडे, वसंत मरवडे, मुख्याध्यापक दिपक जगताप, आर.के. म्हात्रे, गौतम जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होते. यावेळी उपस्थितीत विद्यार्थी वर्गाचे गुलाब पुष्प, नोटबुक, पेण व खाऊ देऊन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच नवागत विद्यार्थी वर्गाच्या पालकांनाही भेटवस्तू देऊन त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. इंग्रजी विषयाचे ज्ञान ही काळाची गरज आहे. ती गरज पूर्ण करून आपली मुले जगाच्या व्यावहारिक ज्ञानात कुठेही कमी पडू नये, यासाठी मराठी माध्यमाच्या दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचीच खरी गरज असल्याचे प्रतिपादन चेअरमन महेंद्र पोटफोडे यांनी केले.

Related

Tags: alibagalibag newseducational newsindiakhamb newskhanda colonykolad newskrushival mobile appmaharashtraMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali bense newspanvelraigadshrivardhan newssocial media newssocial newsvaghran news
Previous Post

माथेरान नगरपरिषदेला पत्रकारांचे वावडे

Next Post

पाईपलाईनच्या कामामुळे नागरिक त्रस्त

Antara Parange

Antara Parange

Related Posts

जातवैधता प्रमाणपत्रासाठी कोळी महासंघाचा एल्गार
sliderhome

जातवैधता प्रमाणपत्रासाठी कोळी महासंघाचा एल्गार

June 16, 2026
sliderhome

ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धनाला यशस्वी प्रतिसाद

June 16, 2026
बॉक्सिंगमध्ये पनवेलकर चमकले
क्रीडा

बॉक्सिंगमध्ये पनवेलकर चमकले

June 16, 2026
प्रवीण पांडे नवे पोलीस निरीक्षक
sliderhome

प्रवीण पांडे नवे पोलीस निरीक्षक

June 16, 2026
कामार्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापच्या प्रगती शिंगरुत बिनविरोध
sliderhome

कामार्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापच्या प्रगती शिंगरुत बिनविरोध

June 16, 2026
नाट्यांकुर नाट्य महोत्सवाला उदंड प्रतिसाद
उरण

नाट्यांकुर नाट्य महोत्सवाला उदंड प्रतिसाद

June 16, 2026
Next Post
पाईपलाईनच्या कामामुळे नागरिक त्रस्त

पाईपलाईनच्या कामामुळे नागरिक त्रस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?