। चिपळूण । प्रतिनिधी ।
खेर्डी मोहल्ला येथील कब्रस्थानला कंपाऊड वॉल व पाखाडी रस्ता करण्याच्या कामाचे भूमीपूजन माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले.
खेर्डी मोहल्ला येथील कब्रस्थानसाठी कंपाऊड वॉल व पाखाडी बांधण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती. याठिकाणची गरज लक्षात घेऊन माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी कोयना भूकंप पुनर्वसन निधी अंतर्गत या कामासाठी पाच लाख निधी मंजूर करून घेतला आहे. याकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होत असल्याने सदर कामाचे भूमीपूजन सदानंद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती उपसभापती तथा शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष जयंद्रथ खताते, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख संतोष सुर्वे, शिवसेना विभागप्रमुख शशिकांत कासार, खेर्डी उपसरपंच तथा शिवसेना उपविभागप्रमुख विजय शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.