। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूणचे सुपुत्र व मुंबई उच्च न्यायालयाचे वकील अॅड. ओवेस पेचकर यांनी चिपळूणवासियांसाठी मोफत कायदेविषयक सल्ला देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. पाग येथील अॅड. पेचकर यांच्या कार्यालयात दि. 14 ते 16 एप्रिल या कालावधीत चिपळूण शहर व परिसरातील नागरिकांना सिव्हील व क्रिमीनल याबाबतच्या केसेसबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच गरिबांसाठी सल्ला देतानाच सामाजिक भावनेतून त्याची केसही लढविली जाईल, असेही अॅड. पेचकर यांनी सांगितले.
दि. 14 एप्रिलपासून तीन दिवस हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पाग उघडा मारुती मंदिर येथील कार्यालयात नागरिकांना कायदेशीर सल्ला दिला जाणार आहे. नागरिकांनी आपल्या कायदेविषयक अडचणी घेऊन तीन दिवसांत सकाळी 11 ते 5 या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन अॅड. ओवेस पेचकर यांनी केले आहे.