चिपळूणमध्ये विकासकामांचे भूमिपूजन

। चिपळूण । वार्ताहर ।
परिसरातील अनेक वर्ष प्रतिक्षेत असणार्‍या पालीमार्ग रस्ता आणि नाला काम या विकासकांमाचे भूमिपूजन माजी आ.बाळ माने यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक समाधान व्यक्त करीत आहेत.
या परिसरात गेली अनेक वर्षे निर्माण झालेली वस्ती दिवसागणिक विस्तारत आहे. पण लोकवस्तीच्या तुलनेत अपेक्षित विकास कामे प्रलंबित स्वरूपात आहेत. अशावेळी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांच्या नेतृत्वाखाली जनता दरबार भरविला असून त्याअंतर्गत ही समस्या उजेडात आली.
यानंतर या समस्येसंदर्भात नगराध्यक्षांनी जातीने लक्ष घालून तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता करत या कामांचे भूमिपूजन केले.
याप्रसंगी कार्यक्रमाला नगराध्यक्षा सुरेखा नितीन खेराडे, नगरसेवक आशिष खातू, परिमल भोसले, रसिका देवळेकर, विजय चितळे, नुपूर बाचीम तसेच भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा नीलिम गोंधळी, मधुकर निमकर, वैशाली निमकर, सुयश पेठकर, संदेश ओक, उल्हास भोसले, वैभव चव्हाण आदी उपस्थित होते.

Exit mobile version