शेकापकडून उद्या सायकल वाटप

ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
| चौल | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बुधवार, दि. 29 जून रोजी सावित्रीच्या लेकींना सायकल वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चौल सागमळा येथील पाठारे क्षत्रिय हॉलमध्ये हा कार्यक्रम दुपारी तीन वाजता होणार आहे.

या कार्यक्रमास शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, जि.प. माजी सदस्य अ‍ॅड. आस्वाद पाटील, शेकापच्या महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, माजी उपसभापती संदीप घरत, सभापती प्रमोद ठाकूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी, या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शेकापचे चौल शहर प्रमुख अरविंद शिवलकर, एस.पी. ठाकूर, विजय ठाकूर, आर.डी. नाईक, राहूल नाईक, नंदू नाईक, रमेश म्हात्रे, नरेश म्हात्रे, काशिनाथ घरत, विनोद ठाकूर, सुधाकर ठाकूर यांच्याकडून करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चौल शेकापचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

Exit mobile version