चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने जपली बांधिलकी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शाळेचा प्रवास सुकर व्हावा आणि गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण सायकलअभावी अडू नये, या उद्देशाने चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने चरी येथे 107 हून अधिक विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.
चरी ग्रामपंचायत हद्दीतील पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांची कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माहिती घेऊन ही मदत करण्यात आली. चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, राज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप नाईक, नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, नगरसेवक अनिल चोपडा, माजी नगरसेविका वृषाली ठोसर, माजी नगरसेविका संजना कीर आदी मान्यवरांसह चरी, कोपर, कोपरपाडा, रायंदे आदी गावांतील ग्रामस्थ, महिला, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











