कोप्रोलीत भाजपला जोरदार धक्का

पदाधिकाऱ्यांसह 200 कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

| उरण | प्रतिनिधी |

कोप्रोली येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीर कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हाप्रमुख माजी आ. मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आगरी, कोळी व आदिवासी समाजाच्या दोनशे कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी ॲड. पर्जन्य म्हात्रे, नंदन म्हात्रे, महेश कोळी, माजी उपसरपंच सारिका म्हात्रे, ग्रामपंचयात सदस्या शानी कातकरी यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांचे माजी आ. मनोहर भोईर यांनी शिवबंधन बांधून व भगवी शाल अर्पण करून स्वागत केले. या प्रवेशाने कोप्रोलीत ठाकरे गटाची ताकद वाढली असून, आगामी निवडणुकांमध्ये याचा भाजपला जोरदार धक्का लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक बी.एन. डाकी, माजी सभापती विश्वास म्हात्रे, तालुका उपसंघटक रुपेश पाटील, महिला सेनेच्या उपजिल्हा संघटिका ममता पाटील यांनी मार्गदर्शन करताना स्थानिक भाजप आ. महेश बालदी यांच्या फसव्या विकासाची लक्तरे काढत केंद्र सरकार तसेच गद्दार शिंदे सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. याप्रसंगी चिरनेर, कलंबुसरे, पुनाडे, वशेनी, सारडे, कोप्रोली ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या निवडून आलेल्या सरपंच उपसरपंच सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी सभापती स्वाती म्हात्रे, चिरनेर सरपंच भास्कर मोकल, पंचायत समिती सदस्य लवेश म्हात्रे, माजी तालुकाप्रमुख राजीव म्हात्रे, भा.वि. सेनेचे जिल्हा संघटक रोहिदास पाटील, विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, तालुका संपर्क संघटिका प्रणिता म्हात्रे, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपतालुका प्रमुख मधुसूदन पाटील, विभाग प्रमुख भूषण ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते अनंत पाटील, मनोज पाटील, आवरे सरपंच निराबाई म्हात्रे, सोशल मीडिया समन्वयक नितीन ठाकूर उपस्थित होते. जाहीर मेळाव्यासाठी शाखा प्रमुख आकाश म्हात्रे, उपशाखा प्रमुख निखिल म्हात्रे, माजी उपसरपंच नीरज पाटील, विपुल म्हात्रे, उपसरपंच योगेश पाटील यांच्यासह नंदनाथ म्हात्रे, अशोक पाटील, रवी म्हात्रे, विश्वनाथ पाटील, उल्हास पाटील, उत्तम पाटील, राजेंद्र पाटील, प्रवीण म्हात्रे, प.र. पाटील, किशोर म्हात्रे, अनिल पाटील, प्रवीण पाटील, आणेश म्हात्रे, गिरीश म्हात्रे, रुपेश म्हात्रे, प्रल्हाद म्हात्रे, बाळू पाटील, अजित म्हात्रे, विनय म्हात्रे, प्रभाकर म्हात्रे, मनोहर कातकरी यांनी मेहनत घेतली.

अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर व्हावे, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. त्यांनी स्फूर्ती दिली. हजारो शिवसैनिक अयोध्येत गेले आणि बाबरी पाडली. मात्र, ज्यांनी बाबरी पाडत असताना पळ काढला, ते आज हिंदुत्वाचा डांगोरा पिटत आहेत. हिंदूच्या धार्मिक अस्मितेचे राजकारण करणाऱ्या भाजपला बाळासाहेबांचा, शिवसेनेचा विसर पडला. मंदिर निर्माणाच्या कार्यात शिवसेनेचा त्याग सर्वश्रुत आहे. स्थानिक आ. महेश बालदीच्या फसव्या विकास योजनांना आता बळी पडू नये. केंद्र आणि राज्य सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. त्यामुळे इथल्या मातीचा, जातीचा, हक्काचा आमदार निवडून आणण्याचे काम कार्यकर्त्याचे आहे.

मनोहर भोईर, माजी आमदार

भाजपाचे स्थानिक आ. महेश बालदी यांच्या कार्यपद्धतीला सर्व कार्यकर्ते कंटाळले आहेत. तिथं सन्मान नव्हता. कामे होत नव्हती. त्यामुळे जिथं सन्मान नाही, तिथं काम करणे शक्य नाही. मनोहर भोईर यांची कार्यपद्धती अनुभवली आहे. सर्वसामान्यांना प्रामाणिकपणे न्याय देण्याच्या त्यांच्या पद्धतीवर प्रभावित होऊन प्रवेश करत आहोत.

ॲड. पर्जन्य म्हात्रे, पक्ष प्रवेशकर्ते
Exit mobile version