मुंबई इंडियन्सला मोठा झटका, सूर्यकुमार यादव आयपीएलमधून बाहेर?

| मुंबई | वृत्तसंस्था |

आयपीएल 17 व्या मोसमाचं काउंटडाऊन सुरु झाले आहे. लोकप्रिय क्रिकेट स्पर्धेला 100 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. यंदाच्या हंगामाला (दि.22) मार्चपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. तर मुंबई इंडियन्स पहिल्या सामन्यात (दि.24) मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध भिडणार आहे. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्संच नेतृत्व करणार आहे. त्याआधी मुंबईच्या गोटातून वाईट बातमी समोर आली आहे. सूर्यकुमार याने मुंबईला मोठा झटका दिला आहे. दुखापतग्रस्त सूर्यकुमारला आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावं लागू शकते. इतकंच नाही, तर सूर्याकुमारवर आयपीएलमधून बाहेर पडण्याचा धोका आहे.

सूर्यकुमार याची बंगळुरुतील एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट पार पडली. मात्र, सूर्याला एनसीएकडून हिरवा कंदील मिळाला नाही. क्रिकेटर दुखापतीनंतर एनसीए अर्थात नॅशनल क्रिकेच एकेडमीमध्ये दुखापतीतून फिट होण्यासाठी जातात. तिथे खेळाडूंवर तज्ञांकडून देखरेख ठेवली जाते. त्यानंतर त्यांना टेस्ट द्यावी लागते. त्या टेस्टमध्ये पास झाल्यानंतर एनसीए तो खेळाडू फिट असल्याचं जाहीर करते. त्यानुसार (दि.19) मार्च रोजी टेस्ट होती. मात्र यामध्ये सूर्याला एनसीएकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे सूर्याला 17 व्या हंगामातील काही सामन्यांना मुकावे लागू शकते.

Exit mobile version