टीम इंडियाला मोठा धक्का; ‘हा’ स्टार गोलंदाज घरी परतला

। मुंबई । वृत्तसांथ ।

आशिया चषक 2023 च्या मध्यावर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ऐन स्पर्धेतून ब्रेक घेत आपल्या घरी परतला आहे. टीम इंडिया सोमवारी (दि.4) नेपाळविरुद्ध आशिया चषकातील आपला दुसरा सामना खेळणार आहे. परंतु, बुमराह मात्र नेपाळविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही.

दरम्यान, त्यातल्या त्यात चांगली बातमी अशी की, बुमराह लवकरच पुन्हा संघात सामील होणार आहे. तो नेपाळविरुद्धचा सामना खेळणार नाही. मात्र त्यानंतर तो सुपर-4 साठी भारतीय संघात पुन्हा सामील होणार आहे. बुमराह वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुमराहच्या घरी एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार म्हणूनच ताे मायदेशी परतला असल्याचे समजते.

जसप्रीत बुमराहला पुत्ररत्न 
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने आज सकाळी मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्माने झालेला आंनद बुमराहने सर्वांसोबत शेअर केला आहे. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी घरातील छोट्या पाहुण्याचे नाव 'अंगद' ठेवलं आहे. 
Exit mobile version