ग्रीनला खरेदी करणे मोठी चूक: हॉग

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आरसीबीने मुंबईचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनचा आपल्या ताफ्यात समावेश केला. आरसीबीचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने व्यक्त केले आहे.
कॅमेरून ग्रीनने मुंबईसाठी एक हंगाम खेळला असून, 16 सामन्यात 452 धावा केल्या आणि 6 विकेट घेतल्या. आरसीबीने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला 17.5 कोटी रुपयांना विकत घेतले. परंतु हॉगला वाटते की हा योग्य पर्याय नव्हता. तो म्हणाला की, या संघाकडे बघितले तर ते त्यांच्या फलंदाजीच्या क्रमावर प्रचंड पैसा खर्च करतात, पण चांगल्या गोलंदाजांवर खर्च करण्याएवढी रक्कम त्यांच्याकडे नाही. आयपीएलमध्ये एकूण बचाव करण्यासाठी आणि खेळात समतोल राखण्यासाठी तुम्हाला चांगल्या गोलंदाजांची गरज असते. यामुळे मला असे वाटते की, हा आरसीबीचा योग्य निर्णय नाही.

Exit mobile version