। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आयपीएल 2024चा लिलाव सुरू होण्याआधी टी20 चे सुपरस्टार आणखी एका मोठ्या कमाईसाठी तयार आहेत. याआधी सांगितल्याप्रमाणे बीसीसीआय डिसेंबरच्या अखेरीस हा कार्यक्रम आयोजित करण्यास उत्सुक आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही याची काळजी आयपीएल घेणार आहे. आयपीएल लिलाव पर्ससाठी, ते तब्बल 100 कोटी रुपयांपर्यंत वाढवले जाणार आहे.
सध्या सर्व लक्ष विश्वचषकावर आहे आणि एकदा सर्व तपशीलांची उजळणी केली की आम्ही आयपीएलच्या प्रमुखांकडे जाऊ आणि विश्वचषकानंतरची तारीख आम्ही ठरवू. डिसेंबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात हे होण्याची शक्यता आहे. पण नंतर फक्त आयपीएल जीसीच्या बैठकीत यावर चर्चा केली जाईल. तसेच हे ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला नक्कीच होणार नाही. आम्ही सर्वांसाठी सोयीस्कर असणारी तारीख पाहण्याचा प्रयत्न करू, असे बीसीसीआयच्या एका अधिकार्याने सांगितले.
यावेळचा आयपीएल लिलाव हा एक छोटा लिलाव आहे ज्यामध्ये खेळाडू रीटेन करण्याच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही. नवीन हंगामात प्रत्येक संघाचे बजेट कॅप मागील हंगामापेक्षा 5 कोटींनी वाढवण्यात आले आहे. म्हणजेच 95 कोटी रुपयांवरून 100 कोटी रुपयांपर्यंत वाढवलेले दिसेल. बजेट 95 कोटींपर्यंत वाढल्याने मोठ्या प्रमाणावर बोली लावताना दिसून आले होते. सॅम करन, कॅमेरॉन ग्रीन, बेन स्टोक्स आणि निकोलस पूरन या सर्वांनी 15 कोटींहून अधिक कमाई करून आयपीएल लिलावाचा विक्रम मोडला. त्याखालोखाल हॅरी ब्रूकने सनरायझर्स हैदराबादकडून 13 कोटी रुपये मिळवले.
डिसेंबरमध्ये जेव्हा लिलाव होईल तेव्हा पुन्हा अशाच मोठ्या बोलींची अपेक्षा केली जाऊ शकते. फ्रँचायझींनी आगामी हंगामासाठी त्यांच्या योजना तयार करण्यास सुरुवात केली आहे. तळापासून
दुस-या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने आधीच आपल्या प्रशिक्षक कर्मचार्यांची उचलबांगडी केली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने अँडी फ्लॉवरच्या जागी जस्टिन लँगरला स्थान दिले आहे. आरसीबीने संजय बांगर आणि माईक हेसन यांच्यापासून फारकत घेतली आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स देखील नवीन प्रशिक्षकाच्या शोधात असलेल्या फ्रँचायझींमध्ये आहेत.
भारतीय बोर्ड देखील लॉजिस्टिक समस्यांमुळे ख्रिसमसच्या जवळची कोणतीही तारीख टाळू इच्छित आहे. सुट्टीचा काळ असल्याने हॉटेल्स बुक करणे कठीण झाले आहे. ठिकाणाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मुंबई, जयपूर, अहमदाबाद, कोची आणि कोलकाता ही खझङ 2024च्या लिलावासाठी संभाव्य ठिकाणे आहेत. IPL 2023 चा लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयोजित करण्यात आला होता. BCCI ला हॉटेल फायनल करण्यात इतकी अडचण आली होती की रिकी पाँटिंग आणि इतर अनेक दिग्गजांना ऑनलाईन उपस्थित राहावे लागले होते.