मोठी बातमी! भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन

| पुणे | प्रतिनिधी |

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बुधवारी (दि.28) बारामतीमध्ये दाखल होणार होते. या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, त्यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात शोककळा पसरली असून सगळ्याच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवार हे 66 वर्षांचे होते. राज्याच्या राजकारणात मागील 40 वर्षांपासून अजित पवार यांचा वावर होता. धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता, रोखठोक भाष्य यामुळे अजित पवार चर्चेत राहिले होते. अजिततदादांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दाखल होणार होते. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला.

Exit mobile version