मोठी बातमी! अजित पवारांसह सर्व नेते शरद पवारांच्या भेटीला

| मुंबई | वृत्तसंस्था ।

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे धक्कातंत्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतील फुटीर गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिंदे सरकारमधील राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.

पावसाळी अधिवेशनाआधी अजित पवार गटाच्या मंत्र्याची देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली. बैठकीला सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर शरद पवार यांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ वाय बी चव्हाण सेंटरला पोहचले आहेत. बैठकीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या बैठकीसाठी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखील पोहचले आहेत.

Exit mobile version