। मुंबई । वृत्तसंस्था ।
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली आहे. गेल्या सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. यावरच आज सुनावणी झाली असून अखेर 100 दिवसांनंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे.