। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे. आता निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग प्रशस्त केल्याने आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाण्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून उद्यापर्यंत (दि.7) शरद पवार गटाला चिन्हाबाबत कळवण्यास सांगण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने मांडलेले मुद्दे अजित पवाराकंडील पक्ष खरा पक्ष आहे पक्ष आणि चिन्ह अजित पवार वापरतील दोन खासदार अजित पवार गटाच्या बाजूने 5 आमदारांनी दोन्ही बाजूंनी पत्र दिलं उद्या 7 फेब्रुवारीपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्ह सूचवावं पक्षांतर्गत निवडणूक झाल्या नाहीत
शरद पवार गटासमोर मोठं आव्हान लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाने कायदेशीर लढाईसाठी फार कमी वेळ आहे. इतकेच नव्हे, तर कायदेशीर लढाई लढायची झाल्यास पक्ष आणि चिन्ह सुद्धा मिळणार नसल्याने मोठी रणनीती आखावी लागणार आहे. जे नाव आणि चिन्ह दिलं जाईल ते अत्यंत कमी कालावधीत लोकांपर्यंत पोहोचावावं लागणार आहे.