धोनीच्या नावे मोठा विक्रम

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आयपीएल 2024च्या 46व्या सामन्यात चेन्नईने हैदराबादच्या रेकॉर्डब्रेक धावसंख्येचा दबदबा धुळीस मिळवला आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने हैदराबादवर तब्बल 78 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह एमएस धोनीने आयपीएलमध्ये इतिहास रचला. त्याने अशी कामगिरी आपल्या नावे केली आहे, जी आजवर कोणालाही जमली नाही.

एमएस धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 259 सामने खेळले आहेत. या लीगमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडूचा विक्रम धोनीच्या नावे आहे. यापैकी 150 विजयी झालेल्या सामन्यांमध्ये धोनी संघाचा भाग होता. म्हणजेच तो आयपीएलच्या इतिहासात 150 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत आतापर्यंत कोणताही खेळाडू एमएस धोनीपर्यंत पोहोचू शकलेला नाही.

Exit mobile version