। बोर्लीपंचतन । वार्ताहर ।
रा.पां. दिवेकर दांडगुरी हायस्कूल विद्यालयाने वैयक्तिक व सांघिक स्पर्धेत 100, 200, 400, 600, 800, 1 हजार 500 व 3 हजार मीटर धावण्यात तसेच 4 x 100 व 4 x 400 मीटर रिलेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच, मुलींच्या हॉलीबॉल स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक तर, 17 वर्षे वयोगटात व्दितीय क्रमांक पटकावला आहे. खो-खो स्पर्धेत 14 व 17 वर्षे वयोगटातील मुले व मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक गणेश पाटील, विश्वास खोत, संदीप तमनर, बाबुराव जगनर आदी शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संस्थापक रा.पां. दिवेकर दांडगुरी हायस्कूलमध्ये संपन्न झाला. यावेळी स्थानिक शाळा समितीचे सभापती वसंत राऊत, माजी गटशिक्षणाधिकारी राजन सांबरे, पंचक्रोशी क्रीडा मंडळाचे सचिव वाणी, मुख्याध्यापिका सांबरे, क्रीडा समन्वयक विजय मर्चंडे, विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक तसेच सर्व खेळाडू उपस्थित होते.