वायशेत फाटा येथील गतिरेाधकावरून पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बुरुमखान वरसोली अलिबाग ते कीहीम असा प्रवास करीत असाताना दुचाकी वायशेत फाटा येथील रस्त्यावरील गतिरेाधक वरुन नियंत्रण सुटल्याने पडून जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सदर तरुण टीव्हीएस कंपनीची लाल रंगाची एनटॉर्क स्कुटी क्र.एमएच 06/सीसी-9742 वरून बुरुमखान वरसोली अलिबाग ते कीहीम असा प्रवास करीत होता. वायशेत फाटा येथील रस्त्यावरील गतिरेाधक वरुन भरधाव वेगाने चालवत असताना नियंत्रण सुटल्याने अपघात झाला होता. यात दोघे जण जखमी झाले होते. जखमी असलेल्या दोघांपैकी उपचारादरम्यान एकाच मृत्यू झाला आहे.

याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क.304 A,279,337,338 मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस /हवालदार रुपेश निगडे हे करीत आहेत

Exit mobile version