ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

। सुकेळी । वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्गावरील कासनई नवरत्न हॉटेलजवळ ट्रेलर आणि दुचाकी यांचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरची घटना मंगळवारी सकाळी घडली. संदेश सदानंद घाणेकर असे मृताचे नाव आहे.

सुकेळीकडून नागोठणेकडे ट्रेलर जात होता. यावरील चालक ओमप्रकाश रामपाल पटेल (वय-36 रा. पांडापूर) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. समोर दुचाकीवरुन संदेश सदानंद घाणेकर (वय- 32 रा. सावर्डे, ता. चिपळुण) हे जात असताना दुचाकीला मागून ठोकर दिली. त्यामध्ये संदेश घाणेकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version