दुचाकी चोराला अटक

| महाड | प्रतिनिधी |

औद्योगिक वसाहतीमधून दुचाकीची चोरी करणाऱ्या चोरट्याला एमआडीसी पोलिसांनी गजाआड केले आहे. विठ्ठल मारुती सलगर (25) माळशिरस-सोलापूर असे आरोपीचे नाव आहे. त्याचा दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरु आहे.

याबाबत संदेश गुरव यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. संदेश गुरव हे नांगलवाडी येथील हॉटेल प्रीती पॅलेसमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांनी दुचाकी हॉटेलबाहेर पार्क केली होती. अनावधाने दुचाकीची चावी दुचाकीलाच राहिली होती. ती संधी साधून चोरट्यांनी ही दुचाकी लांबविली. सुदैवाने हा सर्व प्रकार हॉटेल बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. पोलीस नाईक सिध्देश मोरे या प्रकरणी अधिक तपास करित आहेत.

Exit mobile version