उभ्या ट्रेलरला दुचाकीस्वाराची धडक

| पनवेल | वार्ताहर |

उभ्या ट्रेरला पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना पनवेल जवळील माताजी टेकडी समोरील पुणे लेन सर्व्हिस रोडवर घडली आहे. ट्रेलर चालक सुशील पटेल याने पुणे लेन सर्व्हिस रोड माताजी टेकडी समोर ट्रेलर उभा केला होता. त्यावेळी त्याच्या पाठीमागून आलेला दुचाकीस्वार ट्रेलरला जोरदार धडकला. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पाणावले शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version