जैव इंधन कोळसा प्रकल्प भूमीपूजन

| कोर्लई | वार्ताहर ।
कृत्रिमरित्या निर्माण होणारे प्रदुषण रोखून तालुक्याच्या विकासात मुरुड स्वप्नपूर्ती प्रोड्युसर कंपनी महत्वाचे पाऊल उचलत आहे. तालुक्यामध्ये या प्रकल्पामुळे होणारी रोजगार निर्मिती, सार्वजनिक विकास, पर्यावरण संवर्धन या प्रकल्पामुळे तालुक्यात आर्थिक उलाढाल होऊन येथील शेतकर्‍यांना व एक स्वयंरोजगाराचे दालन खुले होईल असे प्रतिपादन श्रावण माने यांनी जैव इंधन कोळसा भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अंतर्गत मुरुड स्वप्नपूर्ती बायोफ्युल्स प्रायव्हेट लिमिटेड व मुरुड स्वप्नपूर्ती प्रोडूसर कंपनी लिमिटेड तर्फे तेलवडे येथे ाउज-ङ ( जैविक कोळसा ) प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा तहसीलदार रोहन शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी तुकाराम पाटील, दिलीप दांडेकर, संध्या दांडेकर, तहसीलदार रोहन शिंदे, शैलेश तुकाराम पाटील, मनोज कमाने , निलेश तांबडकर, दिलीप दांडेकर, चिंतामणी बाणकोटकर ,मंदा ठाकूर, कल्पना पवार, निलेश तांबडकर, नामदेव भोईर, अरविंद भोपी, रविंद्र पोतनीस, महेंद्र गांधी, तुकाराम पाटील, मनोज कमाने, जगन्नाथ वाडकर, दिपेश वरणकर, रविंद्र काळोखे, पंचायतमधील माजी सरपंच, उपसरपंच, ग्राम – सेवक, महिला अध्यक्ष, तसेच शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिवानी जगताप यांनी मानले.

Exit mobile version