बायोझेस्ट क्रीडा स्पर्धा उत्साहात

| पनवेल | वार्ताहर |

डी. वाय. पाटील विद्यापीठ नवी मुंबईतर्फे बायोझेस्ट 2024 हा विविध क्रीडा स्पर्धा बुधवारी (दि.31) आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे आयोजन डॉ. देबजानी दासगुप्ता संचालक तसेच, गणेश ढमाळ अध्यक्ष क्रीडा समिती यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाला. क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेट, फुटबॉल, बॉक्स क्रिकेट, वॉलीबॉल, शॉर्टफूट, बुद्धीबळ, रस्सीखेच, तसेच इतर वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूवृत्ती विकसित आणि गुणात्मक स्पर्धा निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविला गेला. या स्पर्धांमध्ये 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमास सुभाष पुजारी पोलीस निरिक्षकांची प्रमुख उपस्थिती लाभली. यांनी मुलांना क्रीडा स्पर्धा, व्यायाम याविषयी मार्गदर्शन केले. विजेत्या स्पर्धकांना यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Exit mobile version