| रसायनी | प्रतिनिधी |
किल्ले शिवनेरीचे सुपुत्र, जगदंबा युवा मंच प्रतिष्ठानचे संस्थापक/ अध्यक्ष व्यापारी दिगंबर ढवळे यांच्या वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी वारकरी संप्रदायाचे भूषण दादा पडळकर, सुरेश वेटेकर, विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष नंदू शेठ वाणी, संचालक हनुमंत शेठ गव्हाणे, भाजी मार्केटचे सुप्रसिद्ध व्यापारी महादेव कोळेकर, सूर्यकांत झेंडे, विकास गाढवे, संदेश ढवळे, दत्ताशेठ कोळेकर, स्वप्निल हांडे, सतीश कोकणे, फिटनेस कोच धनंजय साळेकर, किशोर इंदोरे, सुनील डोके, विवेकानंद शिवदास पडवळ, सुरेश पाबळे, निखिल भोर, पत्रकार अमोल शेरकर, संजय मोरडे तसेच इतर सहकारी यांनी शुभेच्छा दिल्या. दिगंबर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त संपूर्ण सप्ताहात परिसरात 200 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच, सामाजिक कार्य करत असताना वृद्धाश्रमामध्ये फळ वाटप, असंख्य गरजू लोकांना अन्नदान, भाजी मार्केटमधील खेळाडूंना खेळाचे साहित्य वाटप असे मोलाचे योगदान देऊन आपला वाढदिवस साजरा केला.







