रुपेश पाटील यांचा वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा

| वाघ्रण | वार्ताहर |

पेढांबे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते रुपेश श्रीधर पाटील यांचा 44 वा वाढदिवस 7 जुलै रोजी श्री कृपा वृद्धाश्रम परहूर येथे सकाळी 9.30 वाजता संपन्न झाला. यावेळी प्रथम आश्रमाचे संचालक अ‍ॅड. जयेंद्र गुंजाळ यांनी स्वागत करून सर्व वृद्ध महिला-पुरुषांना रुपेश यांच्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमाला उपस्थित सेवानिवृत्त माध्य. शिक्षक किशोर पाटील, वाघ्रण ग्रा.पं. सदस्य पत्रकार दिपक यशवंत पाटील, अनिल पाटील, अजित पाटील, शरद म्हात्रे व साक्षी पाटील आदींनी मनोगते व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर केक कापून आश्रमातील सर्व वृद्धांना वाटप केला. रुपेश पाटील यांनी सर्व वृद्धांना भेटवस्तू दिल्या. त्याचप्रमाणे सर्वाना सपत्नीक अल्पोपहार वाटप केला.

Exit mobile version