महिलेच्या अश्‍लिल व्हिडीओ प्रकरणी: भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहितेला अटकपूर्व जामीन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी महिलेचा अश्‍लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील जोडभावी पोलीस ठाण्यात महिलेने केलेल्या तक्रारीनंतर अटक टाळण्यासाठी महेश मोहिते यांनी अटकपूर्व जामीन मिळवून तुर्त आपल्यावरील कारवाई लांबणीवर टाकली आहे. मात्र या प्रकारामुळे संपूर्ण जिल्हाभरात महेश मोहिते आणि भारतीय जनता पार्टी यांच्यावर टिकेची झोड उठत असून अनेकांनी या प्रश्‍नावर आता माजी खासदार किरीट सोमय्या, चित्रा वाघ महेश मोहितेवर काय कारवाई करणार असा सवाल करीत आहेत.

महेश मोहिते यांचे पहिले लग्न झाले असून घटस्फोट झालेला नाही. पीडित महिलेचेही लग्न झाले असून तीचे पती मद्यपी असल्याने भांडण होत असे. एका सार्वजनिक कार्यक्रमात मोहिते आणि पीडित महिलेची ओळख झाली. त्यानंतर ओळख वाढून त्याच्यात प्रेम निर्माण झाले. दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्याचे खोटे सांगून मोहितेंनी पीडित महिलेशी 6 ऑक्टोबर 2015 साली मुंबईत एका मंदिरात विवाह केला. त्यानंतर पनवेल येथे एका भाड्याच्या घरात दोघे राहू लागले.


काही दिवसाने महेश मोहिते याचा घटस्फोट झाला नसल्याचे पीडित महिलेला कळले. त्यानंतर त्याच्यात वाद निर्माण झाला. त्यानंतर महिलेने खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात मोहिते विरोधात तक्रार दाखल केली. मात्र मोहिते यांनी पीडित महिलेची समजूत काढून फिर्याद मागे घेण्यास भाग पाडले. त्यानंतर मोहिते हे 14 एप्रिल 2021 रोजी सोलापूर येथे पीडित महिलेच्या घरी गेले. त्यावेळी तिच्याशी अनैसर्गिक अत्याचार करून व्हिडीओ बनविला. आणि काही कुठे बोललीस तर व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी दिली. अखेर पीडित महिलेने जोडभावी पेठ पोलीस ठाणे गाठून मोहिते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनुसार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम करीत आहेत. मात्र या प्रकरणामुळे जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

Exit mobile version