| पिंपरी | प्रतिनिधी |
राज्याचे विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये विकास कामांचं उद्घाटन केलं. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते आमने-सामने आल्याने गोंधळ झाला होता. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीचार्ज केला. या वादामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी केली. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी पुण्यामध्ये मेट्रोचे उद्घाटन केले. त्याचवेळी पिंपरीमध्ये पिंपरी मेट्रो स्थानक ते फुगेवाडी मेट्रो स्थानकापर्यंतच्या मेट्रोचे त्यांनी ऑनलाइन उद्घाटन केले. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी मेट्रो स्थानकावर काळे झेंडे दाखवून निषेधात्मक आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांना देखील राष्ट्रवादीने विरोध केला. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, काँग्रेसने सकाळी पंतप्रधानांचा विरोध केला होता. काँग्रेसचे कैलास कदम म्हणाले, ङ्गनिव्वळ श्रेय लाटून, प्रसिध्दी मिळविण्यासाठी आणि काम अर्धवट असतानाही पंतप्रधानांच्या हस्ते भाजप त्याचे उद्घाटन करीत आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा संसदेमध्ये अवमान केला आहे. शेतकरी आणि कामगारांचा अवमान केला आहे. अशा पंतप्रधानांचा तीव्र निषेध शहर काँग्रेसच्या वतीने करीत आहोत.फफ माजी नगरसेवक मारुती भापकर म्हणाले, ङ्गङ्घना खाऊंगा ना खाने दुंगाफ अशी घोषणा देऊन सत्तेत आलेले मोदी आणि भय व भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत आश्वासन दिले होते. परंतु अगदी त्यांच्याविरुद्ध भाजप आणि त्यांचे पदाधिकारी वागत आहेत. अन्याय, अत्याचार सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.