। पनवेल । वार्ताहर ।
शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवसेना भवनाबाबत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानामुळे शिवसैनिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या खांदा कॉलनी शहर शाखेतर्फे शहर प्रमुख सदानंद शिर्के यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करत लाथाबुक्यांचा प्रसाद देत खांदा कॉलनी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या पुतळ्याचे करण्यात आले.
![](http://krushival.in/grygrars/2021/08/shivsena-1-1024x475.jpg)
या प्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख दत्तात्रय महामुलकर, संपत सुवर्णा, शहर संघटक संतोष जाधव, उपशहर संघटक संजीव गमरे, प्रकाश वानखडे, शिवसेना महिला शहर संघटीका सानिका मोरे, उप शहर संघटीका आस्मा खान, विभाग संघटीका स्मिता घाडगे, कार्यालय प्रमुख संदीप तोरणे, उपकार्यालय प्रमुख मोतीराम नागम, ज्येष्ठ शिवसैनिक शिवाजीराव दांगट, माजी शाखा प्रमुख रामदास गोंधळी, शाखा प्रमुख सुनील औटी, अतुल घुग, मंगेश पवार, उपशाखा प्रमुख जयवंत भायदे, तानाजी यादव, युवा सेना शाखाधिकारी ऋषिकेश घुले, युवा सैनिक युगेश कुरणे उपस्तीत होते.
![](http://krushival.in/grygrars/2021/08/shivsena-4-1024x580.jpg)