विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी भाजपकडून हालचाली सुरु

। मुंबई । वृत्तसंस्था ।

महाराष्ट्रात शिंदे गटासोबत हातमिळवणी केल्यानंतर भाजपनं सत्ता स्थापन केली. मंत्रिमंडळ विस्तारही झाला. आता भाजपचं लक्ष्य विधान परिषदेकडे आहे. विधान परिषदेच्या सभापतीपद मिळवण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. विधानपरिषदेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सभागृहाच्या सभापती पदावर आपल्या पक्षाचा नेता बसावा, यासाठी भाजप आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे.

सभागृहाच्या कामकाजावरील पकड घट्ट करण्यासाठी सभापतीपद मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. या पदासाठी भाजपचे विधानपरिषद आमदार राम शिंदे यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळते आहे. सध्या विधानपरिषदेत भाजपचे 25, तर शिवसेनेकडे 11 आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी 10 जागा आहेत. तसेच 16 जागा रिक्त आहेत. यामध्ये राज्यपाल नियुक्त 12 जागांचाही समावेश आहे. विधान परिषदेचा सभापती निवडण्यापूर्वी या जागांची नियुक्ती झाल्यास भाजपचे संख्याबळ महाविकास आघाडी पेक्षा जास्त होतं आणि भाजपला विधान परिषदेतही बहुमत सिद्ध करता येईल.

Exit mobile version