भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांचा सौम्य लाठीमार

राज्यात 105 नगरपंचायतीची निवडणूक प्रकिया सुरु झाली आहे. बीड जिल्ह्यातील वडवणीत मतदानावरून भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर आमने-सामने भिडले. यावेळी परिस्थितीत हाताबाहेर जाऊ नये, याकरीता पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. मतदानाच्या सुरुवातीलाच राडा झाल्यानं वडवणीत तणावाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे मतदान केंद्रावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला.

Exit mobile version