गटारीसाठी तुम्हाला पण मिळाली मोफत कोंबडी?

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अनेक बडे नेते जनतेला आपल्या जाळ्यात अडकविण्यासाठी अनेक युक्त्या लढविताना दिसत आहेत. अशातच गटारी अमावस्येनिमित्त भाजपने अनोखा कार्यक्रम आयोजित करून चक्क कोंबड्यांचेच वाटप केल्याचे समोर आले आहे. ‘सेवा हेच संघटन’ असे सांगत भाजपचे मुंबई सचिव सचिन शिंदे यांनी हा उपक्रम राबविला. बॅनरवरील कोंबडीच्या वर लावलेल्या पंतप्रधान मोदी व अमित शहांच्या फोटोमुळे अनेक मिम्स सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

भारतीय जनता पार्टी तर्फे मोफत कोंबंडी वाटपातील मोदी शहांसहित राज्यातल्या भाजप नेत्यांचा फोटो असलेल्या या बॅनरने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. मोफत कोंबडी मिळाल्यास खऱ्या अर्थाने गोरगरिबांची गटारी साजरी होणार.

Exit mobile version