। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ङ्गसातवाफ म्हणजे पराभूत होणार याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे दोन मत बाद करण्याची भाजपाची मागणी केली आहे. कारण, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी मतपत्रिका हातात घेतली होती. राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज सकाळी 9 वाजेपासून मतदानसा सुरुवात झाली आहे. सर्व पक्षाचे आमदार मतदानाचा हक्क बजावत असून, दुपारी साडेबारा वाजेपर्यंत 238 आमदारांचं मतदान झालं आहे.