। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दिल्लीतील आपच्या आमदारांना आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आपचे खा. संजय सिंह यांनी बुधवारी दिल्लीच्या चार आमदारांसह हा दावा केला. आमदार सोमनाथ भारती, संजीव झा, कुलदीप आणि अजय दत्त यांनी आरोप केला की, त्यांना 20-25 कोटी रुपयांचं आमिष देण्यात आलं आणि त्यांनी नकार दिल्यास सिसोदियासारख्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. मात्र, यापैकी कोणीही भाजप नेत्याचं नाव घेतलं नाही.