| खोपोली | प्रतिनिधी ।
यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर गुरुवारी (दि.18) सव्वापाच तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. चिखले ब्रिज येथे मुंबई वाहिनीवर मुंबई रेल विकास महामंडळामार्फत गर्डर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी द्रुतगती मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 1.15 वाजेपर्यंत, तर दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळेत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कामादरम्यान पूर्णत: बंद राहणार आहे. या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.