कित्ते भंडारी हितवर्धक मंडळातर्फे रक्तदान शिबीर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाच्या 64 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. 6 जुलै रोजी सकाळी 9 वाजता सदर रक्तदान शिबीर मंडळाच्या श्रीबाग येथील कै. गोविंद बाबू नार्वेकर सभागृहात होणार असल्याची माहिती कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष बळवंत शिर्सेकर यांनी दिली.

रक्तदाता हा रुग्णाचा जीवनदाता असून, रुग्ण व उपचार यामधील अमृतासारखा महत्त्वाचा संजीवनी देणारा देवदूत आहे. त्यामुळे सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीतर्फे या शिबिरात रक्तसंकलन केले जाणार आहे. इच्छुक रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान करण्यासाठी 5 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणीसाठी उपाध्यक्ष मधुकर पारकर 9270584588 व संतोष मोरे 9271718519 येथे संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदान करणार्‍या रक्तदात्याला शासकीय रक्तपेढीतर्फे व संस्थेतर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Exit mobile version