। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाच्या 64 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट असताना देखील तब्बल 32 जणांनी उत्स्फूर्त पणे रक्तदान केले. श्रीबाग येथील कै. गोविंद बाबू नार्वेकर सभागृहात सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीतर्फे या शिबीरात रक्त संकलन करण्यात आले. सुरुवातीला संस्थेचे विश्वस्त नरहरी धनाजी तथा तोडणकर गुरुजी यांच्या हस्ते कार्यालयात गणेश पुजन करण्यात आले. तर कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष बळवंत शिर्सेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. तर रक्तदानाचा शुभारंभ कृषीवलचे वृत्तसंपादक भारत रांजणकर यांनी स्वतः रक्तदान करून केले.
उपाध्यक्ष कमळाकर पडवळ, मधुकर पारकर, खजिनदार राम मोरे, सदस्य संतोष मोरे, सुहास मयेकर, प्रथमेश नार्वेकर, तुकाराम शिलधनकर, अभिनेत्री विजया कुडव, वास्तुविशारद शशिकांत मोहिते, सनदी लेखापाल संजय राऊत यांच्यासह कार्यकारीणी सदस्य यशवंत राऊत, भारत रांजणकर, राजेंद्र बांदीवडेकर, संदीप किर, दत्तात्रय म्हात्रे, सचिन खेऊर, योगेश मसुरकर, रक्तपेढीच्या जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉ सारीका बिडये यांच्यासह रक्तपेढीचे तंत्रज्ञ, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व रक्तदात्याना शासकीय रक्तपेढीतर्फे व संस्थेतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.