खोपोलीत रक्तदान शिबीर संपन्न

। खोपोली । वार्ताहर।

लायन्स क्लब ऑफ खोपोली, मुस्लिम वेल्फेअर ट्रस्ट आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समर्पण हेल्थ केअर सेंटर व खोपोली महाजन समर्पण ब्लड स्टोरेज सेंटरसाठी गुरुवारी (दि.०1) खोपोली मुस्लीम कम्युनिटी हॉलमधे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 75 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.

खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले. तर, या शिबिरात युवावर्गाने प्रकर्षाने सहभाग घेतला असून महिला रक्तदात्यांची संख्यादेखील लक्षणीय होती. तसेच, लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष लायन दिपेंद्रसिंग बदोरिया, मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अबू जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर यांच्यासह तीनही संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. तर, अतिक खोत, निजामुद्दीन जळगावकर, अल्पेश शहा अशा अनुभवी आयोजकांनी शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले.

Exit mobile version