रोहा लायन्स क्लबच्या वतीने रक्तदान

| गोवे-कोलाड । वार्ताहर ।
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व क्रांती दिनानिमित्त लायन्स क्लब रोहाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 50 पिशव्या रक्त संकलित केले. या शिबिराला तहसीलदार कविता जाधव, नायब तहसीलदार राजेश थोरे, पंचायत समिती गटविकास अधिकारी श्रीमती पाटील, महेंद्र गुजर, समीर शेडगे, संदीप सरफळे, महेश सरदार, रोटरी क्लबचे सुरेंद्र निंबाळकर, स्वप्नील धनावडे, सतीश महाडिक, विक्रम जैन, सृष्टी फाऊंडेशनचे सुखद राणे, समीधा अष्टीवकर आदींनी सदिच्छा भेट दिली.या शिबीरा करीता जयदेव पवार, भावेश दामाणी, अब्बास रोहावाला, सुश्मिता शिट्याळकर, भाऊसाहेब माने, डॉ. कृष्णा जरग, पराग फुकणे, प्रमोद जैन, सैफी रोहावाला, डॉ. तुषार राजपूत, अलेफिया रोहावाला, माया शहा, अनघा माने, जुमाना रोहावाला, बिना दामाणी आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version