रक्तगट तपासणी शिबीर

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील एम.बी. पाटील इंग्लिश मीडिअम स्कूल येथील विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. उपजिल्हा रूग्णालय रोहा व मच्छिंद्र पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने सदरील रक्तगट तपासणी करण्यात आली. या शिबिरात इ. आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या एकूण 150 विद्यार्थ्यांची ही तपासणी करण्यात आली. डॉ. गोसावी, डॉ. प्राची पाटील, डॉ. सौ. गोसावी या तज्ज्ञांच्या माध्यमातून व येथील मुख्याध्यापिका पूनम देसाई यांच्या उपस्थितीत रक्तगट तपासणी कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यात आला. या शिबिरात रक्तगट तपासणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना रक्तगट कार्डचे वाटप उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

Exit mobile version