तलावात आढळला मृतदेह

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल येथील तलावामध्ये कुजलेल्या अवस्थेमध्ये एक मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. या अनोळखी व्यक्तीचे अंदाजे वय 30 ते 35 वर्षे, डोक्याचे केस काळे, पांढरे, संपुर्ण शरीर कुजलेले असून ठिकठिकाणी शरिराची त्वचा निघालेली, अंगात ग्रे रंगाचा हाफ बाह्याचा टि-शर्ट त्यावर निळ्या रंगामध्ये होलीस्टर कॅलिफोर्निया असे लिहिलेले व त्याच्यावर निळ्या रंगामध्ये पक्षी उडतानाचे लोगो दिसत आहेत. तसेच काळ्या रंगाची फुल पॅन्ट घातलेली आहे. याबाबत काही एक माहिती मिळाल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे येथे संपर्क करावा अगर समक्ष येऊन माहिती दयावी. तसेच सहा. पोलीस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर मो. नं 9117966555 नेमणूक पनवेल शहर पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क करावा.

Exit mobile version