। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. सदर अनोळखी अज्ञात व्यक्तीचे वय अंदाजे 40 ते 47 वर्षे, दोन्ही पाय सरळ, डोक्याचे केस काळे, व दाढी मिशी नॉर्मल सफेद काळी वाढलेली, बांधा-सडपातळ, उंची अंदाजे 5 फुट 4 इंच आहे. याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा सहा पोलीस निरीक्षक सुनील वाघ यांच्याशी संपर्क साधावा.







