नदीपात्रात सापडला बेपत्ता तरुणाचा मृतदेह

अन्य तरुणाचा शोध सुरुच

| रायगड | खास प्रतिनिधी |

महाड तालुक्यातील बिरवाडी येथील दोन तरुण 24 जुलै रोजी बेपत्ता झाले होते. पैकी एका तरुणाचा मृतदेह सावित्री नदीपात्रात सापडला आहे. अन्य बेपत्ता तरुणाचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

ओंकार राजू साळुंखे आणि संदीप राजाराम शिलीमकर हे दोन तरुण 24 जुलै रोजी एकाच दिवशी अचानक बेपत्ता झाले होते. या घटनेची नोंद त्यांच्या नातेवाईकांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली होती. त्या अनुषंगाने शोध सुरू असताना त्यापैकी संदीप राजाराम शिलीमकर या 31 वर्षीय तरुणाचा मृतदेह तालुक्यातील गोमेंडी हद्दीतील सावित्री नदीपात्रात सोमवारी आढळून आला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ओंकार साळुंखे याचा तपास सुरु आहे.

Exit mobile version