भिरा कुंडलिका नदीपात्रात तरुणाचा मृतदेह

| माणगाव | प्रतिनिधी |

तालुक्यातील भिरा गावाच्या हद्दीत शासकीय वसाहतीशेजारी कुंडलिका नदीच्या पात्रात एका 21 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. ही घटना शनिवार, दि.25 मे रोजी सायंकाळी सात वाजण्याच्यापूर्वी घडली. याबाबतची खबर पोलीस पाटील प्रदीप महीपत म्हामुणकर (50) रा.म्हसेवाडी, ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

या घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील मयत इसम संकेत संजय परळकर (21) रा. बहादूरपुरा कंधार, जि. नांदेड, सध्या रा. दत्तवाडी, जि. पुणे हा भिरा गावाच्या हद्दीत शासकीय वसाहतीशेजारी कुंडलिका नदीच्या पात्रात बुडालेल्या अवस्थेत मिळून आला. त्यास उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मयत झाल्याचे सांगितले. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पावर हे करीत आहेत.

Exit mobile version