| मुंबई | वृत्तसंस्था |
बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी मुंबई पोलिसांना आली असून त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिस कंट्रोल रुमला यासंदर्भात एक निनावी फोन कॉल आला होता.
मुंबईत आम्ही बॉम्बस्फोट घडवणार आहोत, असं सांगणारा एक फोन कॉल शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता. समोरून बोलणारी व्यक्ती नेमकी कोण आहे याविषयी कोणतीही माहिती त्या कॉलमध्ये देण्यात आली नाही. बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिल्यानंतर फोन करणाऱ्याकडून अधिक माहिती काढून घेण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्याने केला. मात्र, धमकी दिल्यानंतर लागलीच समोरच्या व्यक्तीने फोन बंद केला.